मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार
मान्सून 2026 चा प्राथमिक अंदाज ; अलनिनो मुळे दुष्काळ पडनार
Read More
खरीप पीकविमा जानेवारीपासून मिळणार
खरीप पीकविमा जानेवारीपासून मिळणार
Read More
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
Read More
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
Read More
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार? सविस्तर माहिती
Read More

लाडक्या बहीणींना शेवटची संधी ; 18000 मिळवण्यासाठी शेवटचा चान्स

लाडक्या बहीणींना शेवटची संधी ; 18000 मिळवण्यासाठी शेवटचा चान्स ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि शेवटची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्या महिलांना या योजनेतून वर्षाला ₹18,000 (प्रति महिना ₹1,500) मिळवायचे आहेत, त्यांच्यासाठी eKYC प्रक्रियेतील चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने अंतिम संधी दिली आहे. या संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. या योजनेचा उद्देश महिला सक्षमीकरण हा असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक महिलांकडून eKYC करताना झालेल्या चुका सुधारण्याची मागणी होत होती. याच मागणीला प्रतिसाद देत, विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ADS किंमत पहा ×

eKYC करताना झालेल्या चुका सुधारण्याची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लाभार्थी महिलांना केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे. याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. जर लाभार्थ्यांनी पूर्वी केलेल्या eKYC मधील चूक वेळेत सुधारली नाही, तर त्यांचे वार्षिक ₹18,000 चे लाभ बंद होऊ शकतात. त्यामुळे, ज्यांची eKYC प्रक्रिया चुकली आहे, त्यांनी लवकरात लवकर ही दुरुस्ती करून घ्यावी. राज्य शासनाने दिलेली ही शेवटची संधी आहे, ज्यामुळे महिलांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी.

Leave a Comment