कर्जमाफी २०२६: कोणकोणत्या बँकांचे कर्ज होणार माफ? जाणून घ्या सरकारचे धोरण आणि महत्त्वाच्या अटी
कर्जमाफी २०२६: कोणकोणत्या बँकांचे कर्ज होणार माफ? जाणून घ्या सरकारचे धोरण आणि महत्त्वाच्या अटी
Read More
अधिक मास 2026: क्यों 12 की जगह 13 महीने का होगा नया साल..दुर्लभ योग
अधिक मास 2026: क्यों 12 की जगह 13 महीने का होगा नया साल..दुर्लभ योग
Read More
PM Kisan Yojana ; हे काम करा तरंच मिळेल हप्ता.. नसता कायमचा बंद
PM Kisan Yojana ; हे काम करा तरंच मिळेल हप्ता.. नसता कायमचा बंद
Read More
तुमची मुलगी होणार ‘लखपती’! महाराष्ट्र शासनाच्या ‘लेक लाडकी’ योजनेतून मिळणार १ लाख १ हजार रुपये
तुमची मुलगी होणार ‘लखपती’! महाराष्ट्र शासनाच्या ‘लेक लाडकी’ योजनेतून मिळणार १ लाख १ हजार रुपये
Read More
नया पश्चीमी विक्षोभ, ईन राज्यो मे होगी भारी बारीश..IMD का अलर्ट
नया पश्चीमी विक्षोभ, ईन राज्यो मे होगी भारी बारीश..IMD का अलर्ट
Read More

निर्यात वाढली-कांद्याच्या भावात होतेय वाढ, आता कांदा विकावा कि थांबावे ?

निर्यात वाढली-कांद्याच्या भावात होतेय वाढ, आता कांदा विकावा कि थांबावे ? शेतकरी मित्रांनो, सध्या कांद्याच्या बाजारभावामध्ये चांगली सुधारणा झालेली दिसून येत आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात “आता विकावा की थांबावे” असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वर्षभर उन्हाळी कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे झालेले मोठे नुकसान या दरवाढीमुळे पूर्णपणे भरून निघू शकत नाही. मात्र, सध्या भावात सुधारणा होण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत: एक म्हणजे, महाराष्ट्रात नवीन कांद्याचे पीक पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने त्याचे उत्पादन घटले आहे आणि बाजारात आवक (सप्लाय) कमी झाली आहे. दुसरे म्हणजे, जुना कांदा संपत येणे आणि नवीन कांदा बाजारात येणे या दरवर्षीच्या संक्रमण काळात भावामध्ये सुधारणा दिसून येते.

ADS किंमत पहा ×

सध्या नवीन कांद्याला गुणवत्तेनुसार भाव मिळत आहेत. उत्तम प्रतीचा (बियाणे क्वालिटी) कांदा ₹2000 ते ₹4000 प्रति क्विंटल दराने विकला जात आहे, तर कोरड्या मालाला ₹1500 ते ₹2000 प्रति क्विंटल दर मिळत आहे. याउलट, ओला, मिक्स किंवा कोम आलेला माल ₹100 ते ₹1000 प्रति क्विंटल अशा कमी दरात विकला जात आहे. शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी की, जर ओला माल जास्त प्रमाणात बाजारात आला, तर तो संपूर्ण बाजाराची सरासरी खाली आणतो. त्यामुळे आपला कांदा व्यवस्थित सुकवून आणि वाळवूनच बाजारात आणावा, जेणेकरून तुम्हाला निश्चितच चांगला दर मिळेल.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment