लाडक्या बहीणींना 2100 रूपये कधी देनार नाना पाटोलेंचा प्रश्न.. शिंदेंनी जाहीर करून टाकलं
Ladki Bahin Yojana: नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session Nagpur 2025) सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) झालेल्या भ्रष्टाचाराची लक्षवेधी सभागृहात मांडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 12 हजार 431 पुरुषांनी प्रत्येकी 1500 रुपये घेऊन 164 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केला. सुनील प्रभू यांच्या या लक्षवेधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, मंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत सभागृहात मांडलं.
जयंत पाटलांचा प्रश्न अन् आदिती तटकरेंचं कारवाईचं आश्वासन
निवडणुकीत जेव्हा ही योजना झाली, तेव्हा अशा अटी यापूर्वी सांगितल्या होत्या का?, ज्या लोकांनी याचा चुकीचे फायदे घेतले त्यांच्यावर कारवई करणार का? योजना जड जाऊ लागल्याने आता KYC आणि कंडीशन योजनांमध्ये घेतले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. यावर पहिल्याच शासन निर्णयातच 2 कोटी 63 लाख लोकांची पडताळणी सुरू केली. इतर विभागतही आम्ही डेटा तपासतोय.
ई-केव्हायसीचं धोरण आणलं, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. केवायसीसाठी आता 13 कंडिशन टाकल्या आहेत. याआधी त्या नव्हत्या, असं जयंत पाटील यांनी पुन्हा सभागृहात नमूद केलं. जयंत पाटील यांच्या या आरोपावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्तुत्तर दिलं. अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे त्या महिलांनी या पैशांसाठी घरातील कर्त्या पुरूषाचे खाते दिले आहे. यासाठीच KYC आपण केली अशी माहिती आदिती तटकरेंनी सभागृहात दिली. त्याचप्रमाणे ज्या पुरूषांच्या बँक खात्यांवर पैसे जमा झाले ती खाती तपासली जातील. या योजनेचा फायदा खरचं पुरूष घेत असेल तर नक्कीच कारवाई होईल, असं आश्वासन आदिती तटकरे यांनी दिलं.
लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, 2100 रुपयेही योग्यवेळी देणार- एकनाथ शिंदे
लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानसभा सभागृहात भाष्य केलं. लाडकी बहीण योजना बंद होणार, असं विरोधक सातत्याने बोलत होते. मात्र लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी आजही सांगतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोणं गेलं? वडपल्लीवार हे नाना पटोले यांचा माणूस होता. ही निवडणूक पुरती घोषणा असं विरोध म्हणाले. हायकोर्टाने तुम्हाला चपराक दिली. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. लाडकी बहिण योजना कधीही बंद करणार नाही. तसेच नाना पटोल म्हणाले, लाडकी बहीणींना 2100 रुपये कधी देणार?, आम्ही योग्यवेळी 2100 रुपये देऊ, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.