सोयाबीनच्या भावात मोठा बदल, पहा आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव
सोयाबीनच्या भावात मोठा बदल, पहा आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव
Read More
Onion rate ; कांदा भावात वाढ , पहा आजचे ताजे कांदा भाव
Onion rate ; कांदा भावात वाढ , पहा आजचे ताजे कांदा भाव
Read More
पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
Read More
मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ३,१५,००० पर्यंतचे अनुदान
मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, ३,१५,००० पर्यंतचे अनुदान
Read More
2026 मध्येही अतीव्रुष्टी होनार का ? पहा कसा राहील पाऊस
2026 मध्येही अतीव्रुष्टी होनार का ? पहा कसा राहील पाऊस
Read More

अतीव्रुष्टी नुकसान भरपाई, उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मिळनार – सर्व जिल्ह्याची अपडेट

खरीप हंगाम २०२५ मध्ये राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीपिके, फळबागा आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी राज्य शासनाने मदत वाटपासाठी मंजुरी दिली असून, विविध जिल्ह्यांसाठी भरपाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच, रब्बी अनुदानाचे वितरण करण्यासाठीही मान्यता देण्यात आलेली होती. सुरुवातीला या अनुदानाच्या वाटपात प्रशासकीय स्तरावर काही अडचणी आल्या, ज्यात वारंवार वितरण थांबणे आणि ‘केवायसी’ (KYC) प्रक्रिया सुरू होणे यांचा समावेश होता. आता पुन्हा एकदा केवायसी करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची रक्कम लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना, येत्या दिवसांपासून पुन्हा एकदा अनुदानाचे वितरण सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ADS किंमत पहा ×

राज्यातील अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासाठी एकूण १९,४६४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यापैकी १३,७७८ कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आले आहे. सुमारे ५,६८६ कोटी रुपयांचे अनुदान वाटप अद्याप बाकी आहे, जे एकूण मंजूर रकमेच्या ४० ते ४५ टक्के आहे. प्रामुख्याने केवायसी पूर्ण न झालेले शेतकरी, सामायिक खातेधारक, मयत खातेधारक आणि फळबागधारक शेतकरी यांच्याशी संबंधित रक्कम वितरणाधीन आहे. ही प्रलंबित रक्कम लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment