95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू ; महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्मार्ट सोलर योजना’ (Smart Solar Scheme) सुरू केली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर योजने’ला पूरक असून, नागरिकांना छतावरील सोलर यंत्रणा बसवण्यासाठी ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवण्यास मदत करते. या योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांच्या पात्रतेची आणि अर्ज मंजुरीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पात्र लाभार्थ्यांना पुढील कार्यवाहीसाठी लवकरच एसएमएमद्वारे सूचना पाठवल्या जात आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सुमारे ५ लाख लाभार्थ्यांना १ किलोवॉटपर्यंतची सोलर सिस्टीम उपलब्ध करून देणे हा आहे.
योजनेचे उद्दिष्ट आणि प्रमुख लाभार्थी गट
राज्य शासनाने ‘स्मार्ट योजने’अंतर्गत एकूण ५ लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेत प्रामुख्याने ज्यांचा वीज वापर १०० युनिट्सपेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. यात दारिद्र्य रेषेखालील (BPL) सुमारे १ लाख ३४ हजार लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद आहे, ज्यांना सर्वाधिक लाभ मिळणार आहे. तसेच, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर कमी उत्पन्न गटातील नागरिकांचाही या उर्वरित ३.५ लाख लाभार्थ्यांमध्ये समावेश आहे, ज्यांना योजनेतून १ किलोवॉटपर्यंतचे सोलर दिले जाणार आहे.




















