शेतकरी कर्जमाफी लवकरच : विधानसभेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जून २०२६ पूर्वीच केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून, आता ही कर्जमाफी लवकरच मार्गी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. या अधिवेशनात कर्जमाफीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेले होते, तसेच जुन्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर आणि सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर सरकारला धारेवर धरण्यात आले होते.
कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी २००९, २०१७ आणि २०२० मध्ये कर्जमाफी करूनही शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत अडकत असल्याचे नमूद केले. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.




















