लाडक्या बहीणींना 2 हप्ते एकत्र ; 3000 मिळनार..कधी मिळनार पहा ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत लाभार्थ्यांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आणि संभ्रम पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते अद्याप प्रलंबित असल्याने, महिलांच्या खात्यात एकत्रितपणे ३००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात महत्त्वाची अपडेट अशी आहे की, हिवाळी अधिवेशनामध्ये या योजनेसाठी ६१०३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, निधीची उपलब्धता असूनही तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे हप्ता वितरणास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.
योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सध्या अर्जांची कडक छाननी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सुरू आहे. ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत किंवा ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विशेषतः एकल, घटस्फोटीत आणि परितक्त्या महिलांना आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढील हप्ते वितरित करणे सरकारसाठी आव्हानात्मक ठरणार आहे, जेणेकरून केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करता येईल.




















