लाडकी बहीण Ekyc नवीन आँप्शन आले, पुन्हा EKYC करावी…मोठा बदल
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. eKYC प्रक्रिया राबवताना ज्या महिलांकडून काही चुका झाल्या असतील, त्यांना आता त्या चुका सुधारण्याची संधी मिळाली आहे. विशेषतः, ज्या महिला अविवाहित आहेत, विधवा आहेत, घटस्फोटीत आहेत, किंवा ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा सर्व भगिनींसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. या सर्व श्रेणीतील महिला आतात्यांची केवायसी पूर्ण करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, सुधारणा करण्याची संधी फक्त एकदाच उपलब्ध आहे आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हा पर्याय उपलब्ध राहणार आहे.
eKYC दुरुस्तीची सोपी प्रक्रिया
केवायसी दुरुस्ती करण्यासाठी, लाभार्थ्यांनी ‘लाडकी बहिण महाराष्ट्र’च्या अधिकृत वेबसाइटवर (ladkibahin.maharashtra.gov.in) भेट द्यावी.
◆ वेबसाइटवर ‘येथे क्लिक करा’ या पर्यायावर क्लिक करून लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा.
◆ ‘मी सहमत आहे’ वर टिक करून ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करावे. आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून सबमिट करावे.
◆ यानंतर, तुम्हाला ‘विवाहित आहात की अविवाहित’ हा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार पुढील माहिती विचारली जाते.
विविध परिस्थितीनुसार eKYC प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
१. विवाहित महिला:
◆पती हयात असल्यास: पतीचा आधार क्रमांक भरून त्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल.
◆पतीचे निधन झाले असल्यास किंवा घटस्फोटीत असल्यास: या महिलांना पतीचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाची कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्याची संमती द्यावी लागते.
२. अविवाहित महिला:
◆ वडील हयात असल्यास: वडिलांचा आधार क्रमांक भरून त्यांच्या ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल.
◆ वडिलांचे निधन झाले असल्यास: वडिलांच्या मृत्यूच्या दाखल्याची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्याची संमती द्यावी लागते.
सर्व परिस्थितीत, जात प्रवर्ग निवडल्यानंतर, कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित कायम सरकारी कर्मचारी किंवा करदाता नाही याची खात्री करून ‘नाही’ हा पर्याय निवडून अंतिम घोषणापत्रावर टिक करून केवायसी सबमिट करावी लागते. सबमिट केल्यानंतर, तुमच्या आधार क्रमांकाची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असल्याचा संदेश तुम्हाला दिसेल.