या तारखेनंतर आवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा ; तोडकर यांच्या हवामान अंदाजानुसार, सध्या राज्यात थंडीचा कडाका जाणवत असून काही भागांत धुरळी आणि धुक्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत म्हणजे २३ डिसेंबरनंतर थंडीचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD) सक्रिय असले तरी, या दोघांच्या ओढाताणीमुळे महाराष्ट्रात सध्यातरी मोठ्या पावसाची शक्यता नाही. प्रामुख्याने खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहू शकते, पण पाऊस पडण्याचे संकेत कमी आहेत.
पुढील दोन महिने म्हणजेच जानेवारी अखेरपर्यंत राज्यात हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिना हा वेस्टर्न डिस्टर्बन्ससाठी पोषक ठरू शकतो, ज्यामुळे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस किंवा गारपिटीचे वातावरण निर्माण होऊ शकते. थंडीची ही परिस्थिती फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत किंवा मार्चच्या सुरुवातीपर्यंत अधूनमधून जाणवत राहील. द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या बदलत्या वातावरणाकडे आणि धुईच्या प्रभावाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण यामुळे पिकांवर बारीक काळे ठिपके किंवा मच्छरचा प्रादुर्भाव वाढू शकतो.




















