पंजाब डख हवामान अंदाज ; थंडी/आवकाळी पाऊस/गारपीट आणि 2026 चा सविस्तर अंदाज ; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीसाठी तीव्र थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, संपूर्ण डिसेंबर महिन्यात थंडीची तीव्रता अधिक असेल, जी २० जानेवारीपर्यंत टिकून राहील. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात ही तीव्र थंडी जाणवेल. या काळात काही ठिकाणी तुरळक ढगाळ परिस्थिती निर्माण होईल, मात्र यामुळे पावसाची शक्यता नाही. या ढगाळ परिस्थितीमुळे फक्त थंडीची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
डख यांनी २०२६ मधील मान्सूनबद्दल गंभीर संकेत दिले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील आणि फक्त पिकांसाठी पुरेसा ठरेल. त्यामुळे राज्यातील तलाव केवळ ५० टक्क्यांपर्यंतच भरतील. मागील वर्षी १००% भरलेले जायकवाडी धरण २०२६ मध्ये फक्त ७० ते ८० टक्क्यांपर्यंतच भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, थंडी कमी झाल्यानंतर लगेच पावसाची शक्यता नसली तरी, २२ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान महाराष्ट्रात गारपीट किंवा अवकाळी पावसाची शक्यता डख यांनी व्यक्त केली आहे, जी दरवर्षी होत आसते.



















