तर ०१ जूलैला रेल्वे थांबवनार,संपूर्ण महाराष्ट्र बंद…कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र टीका केली आहे. मुख्यमंत्री नेहमी दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी देत नाही असे म्हणायचे, परंतु ज्यावर्षी सर्वात मोठा दुष्काळ पडला आणि शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाहून गेले, त्याच वर्षातील ‘चालू कर्ज’ (जे २५ मार्च २०२६ आणि ३० जून २०२६ पर्यंत थकीत होणार आहे) माफ केले जात नाहीये. सरकार देशातील सर्वात मोठी कर्जमाफी करत असल्याचा दावा करत असले तरी, ज्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, त्यांनाच वगळले जात असेल तर अशा कर्जमाफीला काही अर्थ नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
सरकारने एकीकडे कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती दिली आहे आणि दुसरीकडे त्याच कर्जांना कर्जमाफीत घेतले नाही, यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका मोठ्या अडचणीत येणार आहेत. कर्ज वसुली थांबल्यामुळे बँकांना पैसे मिळत नाहीत. परिणामी, जर बँकांना पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम (उदा. ७०० कोटी रुपये) वेळेवर मिळाली नाही, तर जून-जुलै महिन्यात नवीन कर्ज कसे वाटायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.




















