डिसेंबर महीन्याचा अंदाज ; राज्यात आवकाळीचा अंदाज आहे का ? प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी १२ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, आजपासून २५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात कसल्याही पावसाची शक्यता नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची चिंता करू नये. मात्र, या संपूर्ण काळात राज्यात तीव्र थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ही थंडीची लाट अधिक प्रभावी असणार आहे.
राज्यातील विभागांमध्ये थंडीचा तीव्र प्रभाव
राज्यातील सर्व विभागांमध्ये या तीव्र थंडीच्या लाटेचा अनुभव येईल. यामध्ये पूर्वी विदर्भ, पश्चिमी विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा या संपूर्ण भागांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या पट्ट्यातही आभाळ किंवा पाऊस नसणार, पण थंडी तीव्र राहील. तसेच, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही पावसाची चिन्हे नसून केवळ तीव्र थंडीची लाट अनुभवायला मिळेल. मराठवाडा आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्येही उत्तरेकडील वाऱ्यांमुळे दिवसा देखील थंड वातावरण जाणवणार आहे.
















